नंदुरबारात आदिवासी वस्तीवर हल्ला; बाटल्या- दगडांचा पडला खच | पुढारी

नंदुरबारात आदिवासी वस्तीवर हल्ला; बाटल्या- दगडांचा पडला खच

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा: येथील चिंचपाडा भिलाटी व कसाई हट्टी या आदिवासी वस्तींवर अचानक समूहांनी दगड, विटा व काच बाटल्याचा मारा करीत हल्ला करण्‍यात आला. यात पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहनांचे नुकसान झाले असून काही जण जखमी झाले आहेत.अश्रुधुराचा वापर करून  पोलिसांनी परिस्‍थिती आटोक्यात आणली. या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

बिस्मिल्ला चौक गेटजवळ जुगार अड्ड्या नजीक एकाने लघुशंका केली म्हणून त्यास हटकले असता त्यावरून वाद पेटला. पाहता-पाहता या वादाने रौद्र रूप धारण केले.

दोन्हीकडून दगड, विटा, बाटल्यांचा मारा झाला. सुमारे एक तासाहून अधिक काळ धुमश्चक्री झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.  पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.  हल्लेखोऱ्यांनी न जुमानल्यामुळे अश्रुधुराच्‍या ३ नळकांड्या फोडण्यात आल्या. मध्यरात्री २ वाजता संपूर्ण परिस्थिती पोलीस यंत्रणेद्वारे आटोक्यात आणली गेली.

अश्रुधाराच्या ३ नळकांड्या फोडल्या

मंगळवार (दि. १०) रोजी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आता परिस्थिती नियंत्रणात  आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पहाटेच तातडीने नगरपालिका कर्मचारी बोलवून दगड विटा व काचांचा खच उचलून साफ करण्यात आला.

वेळीच पोलीस यंत्रणेने आळा घालून चोख भूमिका बजावल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु, किरकोळ कारणातून दगड विटांचा पाऊस पाडणारी धुमश्चक्री  कशी उडाली ? हा प्रश्न नंदुरबा वासियांना पुन्हा पडला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील 

Back to top button