Latest

पांढरे केस हमखास काळे करतील ‘या’ टिप्स

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: पांढरे केस हाेण्‍यासाठी वयाचा फारसा संबध नसतो. आपले पांढरे केस व्यक्तिमत्वाला बाधा आणत असतील तर डाय करणे हा उपाय केला जातो. मात्र, ही वारंवारची कटकट मिटवून नैसर्गिकरित्या काळे करण्याची साधे सोपे उपाय आहेत.

असे होतील केस काळे

एकदा का केस पांढरे झाले की ते परत काळे होत नाही हा समज आहे. परंतु काही नैसर्गिक उपाय केले तर आपले केस काळे होऊ शकतात.

त्यासाठी काही नैसर्गिक उपाय आणि योग्य आहार असणे आवश्यक आहे.

दोन उपाय करा

केस काळे करण्यासाठी केवळ दोन उपाय करा. वारंवार डाय करण्यापासून तुमची सुटका होऊ शकते.

केसांना काळे करण्यासाठी आवळा पावडर आणि मेंहदी एकत्र करून लावावी. त्यात कांद्याचा रस घालावा.

आवळा, मेंहदी आणि कांद्याचा रस कसा मिसळायचा?

आवळ्यामुळे केसांना नैसर्गिकरित्या ताकद निर्माण करते. रात्री झोपण्याआधी १० ते १२ चमचे आवळा पावडर किंवा मूठभर वाळलेल्या आवळ्याच्या फोडी दोन कप पाण्यात भिजत घालायचे.

ही पावडर लोखंड भांड्यात ठेवावी. तुमच्‍या केसाच्‍या प्रमाणात पावडर भिजवत घालावी.

जर तुम्ही आवळा भिजत घातला असेल तर सकाळी तो बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी.

रात्रभर भिजलेल्या आवळ्यात २ चमचे कॉफी आणि तीन चमचे लिंबूचा रस घालावा.

एक कप आवळा पाण्यामध्‍ये दोन चमचे कॉफी आणि तीन चमचे लिंबू रस घालावा.

मेंहदीत कसे मिसळाल?

आवळा,कॉफी आणि लिंबूच्या रसाच्या मिश्रणात तीन ते चार चमचे मेंहदी पावडर घालावी.

या सगळ्याचे घट्ट मिश्रण तयार करून ते केसांना लावावे. यामध्‍ये पाण्याची मात्रा कमी जास्त होऊ शकते.

कारण तुम्ही आवळा पावडर भिजवली आहे की आवळयाच्या फोडी. त्यामुळे मेंहदीच्या पावडरीची मात्र, त्यानुसार आवळा मिश्रणात मिसळा.

दोन तास लावावी पेस्ट

तयार झालेली पेस्ट केसांना अशी लावा की ती मुळापर्यंत गेली पाहिजे. सगळ्या केसांना चांगल्या पद्धतीने हे मिश्रण लागले पाहिजे.

ही पेस्ट गळून खाली येऊ नये तसेच त्यामुळे त्वचेला त्रास होऊ नये यासाठी मिश्रण लावल्यानंतर तुम्ही शॉवर कॅप घालू शकता.

हे मिश्रण दोन तासांनी पाण्याने धुवून टाका. केस धुताना एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे शॅम्पू अजिबात वापरू नये.

शॅम्पू कधी वापरावा

केस वाळल्यानंतर डोक्याला हेअर ऑइल लावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस धुतले तरी चालतील.

त्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका.

कधी लावायचे मिश्रण

आठवड्यातून दोन वेळेला हे मिश्रण लावावे. तीन महिने सलग असा प्रयोग केल्यास आपल्याला फरक दिसेल.

पुढे आसतत हे मिश्रण लावल्यास सगळे पांढरे केस काळे होतील.

कांद्याचा रसही गुणकारी

कांदा चिरून मिक्सरमध्ये घालून तो बारीक करावा. वस्त्रगाळ करून त्याचा रस काढावा.

हा रस आठवड्यातून तीन वेळा आपल्या केसांना मुळापर्यंत लावावा. हा रस २० ते ४० मिनिटे केसांना लावून ठेवावा.

हा नैसर्गिक उपाय तुमचे केस झडू देणार नाही. शिवाय केसही काळे करेल. तुम्ही कांद्याचा रस करून तो फ्रीजमध्येही ठेवून आठवडाभर वापरू शकता.

पहा व्हिडिओ: फुकटी बिर्याणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT