Latest

डी. एस. कुलकर्णी (DSK) यांच्या कुंटुबातील आणखी एकाला जामीन

backup backup

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस कुलकर्णी (DSK) यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे.

१७ फेब्रुवारी २०१८ पासून कुलकर्णी आणि पत्नी हेमंती पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणामध्ये न्यायालयाने मध्यंतरी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला हाेता. वकील अशुतोष श्रीवास्तव यांनी कुलकर्णी यांची बाजू मांडली.

२०१८ पासून कुलकर्णी यांच्या नात्यातील अनेकांना फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे. हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची आता तुरूंगातून सुटका होणार आहे. मात्र न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली होती. दरम्यान, हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. हेमंती यांना जामीन मिळाला असला तरी डीएसके जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

या प्रकरणामध्ये न्यायालयाने मध्यंतरी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज जून महिन्यामध्ये विशेष न्यायालयाने फेटाळला हाेता.

२०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत.

सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

कुलकर्णी यांच्या धायरी भागात १२ मालमत्ता

या प्रकरणात ईडीने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते.

कुलकर्णी यांच्या शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती. धायरी भागात त्यांच्या १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले.

पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी भागात त्यांच्या मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

या जागांची किंमत बाजारभावानुसार दोनशे ते तीनशे कोटी रूपये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचलं का ? 

SCROLL FOR NEXT