मुंबई; पुढारी ऑनलाईन : आई कुठे काय करते या मालिकेत डॉक्टर वसुधा अरुंधतीला सर्जरी करण्यासाठी ऍडमिट होण्यासाठी सांगतात. तेव्हा अरुंधती घाबरते. आई कुठे काय करते मालिकेतील हा भाग प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखा आहे. एका आईला स्वत:च्या घरातून जेव्हा घराबाहेर पडावं लागतं. जेव्हा तिला पैशांची चणचण भासू लागते. तेव्हा ती स्वत:चं अस्तित्व शोधायला लागते.
ती म्हणते- मुलांच्या बाळंतपणावेळीचं ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती. नंतर कधी डॉक्टरकडे गेलेली नाही. अरुंधतीवर शस्त्रक्रिया होते.
एकीकडे संजना आणि अरुंधतीचा नवरा अनिरुध्द दोघे लग्न करणार आहेत. अरुंधती घराबाहेर पडलीय. तिला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. तेव्हा अभि म्हणतो की, आई काळजी करू नको. मी तुझ्यासोबत असेन. तेव्हा डॉक्टर वसुधा अरुंधतीला काही औषधे लिहून देतात आणि आजचा दिवस फक्त लिक्विड घ्या. असे सांगत सर्जरीची तयारी करण्यासाठी डॉक्टर जातात.
हॉस्पिटलचा खर्च पाहून अभि म्हणतो, आमच्यासाठी फक्त तुझी तब्येत महत्वाची आहे. तुझं ऑपरेशन झालं की, ८ दिवस घरी ये राहायला. आम्ही तुझी काळजी घेण्यासाठी आहोत. तुझी जास्त धावपळ होणार नाही. यावर अरुंधती मी विचार करेन, असे सांगते.
दुसरीकडे, अरुंधतीने अनिरुध्दशी घटस्फोट घेतल्यानंतर संजना अनिरुद्धशी लग्न करण्यास उत्सुक आहे. तिला खरेदीला जायचं असतं. पण, अनिरुद्धसमोर कांचन आणि अविनाश संजनाचा अपमान करतात.
कांचन अनिरुद्धला सांगते की, ती संजनाला तिच्या घरात येऊ देणार नाही. कारण, यशने सांगितलेले असते की, संजना देशमुख कुटुंबात आल्यास तो हे घर सोडून जाईल.
दरम्यान, अरुंधतीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोर जावं लागतंय. ती नवीन नोकरीच्या शोधात आहे. अनघा नंतर तिला अचानक भेट देते.
अनघा तिला आणखी एक सरप्राईज देते. ती अरुंधतीला नोकरीची नवीन संधी आल्याचे सांगते. अरुंधती सामाजिक कार्य असणारी नोकरी पटकन स्वीकारते.
दुसरीकडे, संजना अनिरुध्दशी लग्न करण्यास उत्सुक आहे. पण, गौरी तिला सांगते की देशमुख कुटुंबातील कोणीही तिच्या लग्नात सहभागी होणार नाही. पण संजना अजूनही तिच्या निर्णयावर ठाम आहे.
ईशा अभिला विचारते की, आई ऑपरेशन झाल्यानंतर येणार आहे ना राहायला? तेव्हा अभि म्हणतो, अजून ठरलेलं नाही. त्यावर कांचन म्हणते, अरुंधती येथे येणार नसेल तर मी बोरिवलीला जाते तिची काळजी घेण्यासाठी.
तेव्हा अविनाश म्हणतो की, मी वहिनीला समजावतो. कांचना आप्पांना फोन करून अरुंधतीला समजवण्यासाठी सांगते.
तेवढ्यात संजना सर्वांसाठी बटाटेवडे घेऊन येते. पण, घरातल्या मंडळींना तिचा राग येतो. तेव्हा अनिरुद्धची एन्ट्री होते. तो विचारतो की, काय चर्चा सुरू आहे. तेव्हा अभि अरुंधतीच्या ऑपरेशनबद्दल सांगतो.
अनिरुद्ध म्हणतो, आपण तिला घरी घेऊन येऊयात. काहीच हरकत नाही. तेव्हा संजना इथे कशाला आणायचं? असं विचारते. कांचन संजनावर भडकते. ती म्हणते, तू मध्ये बोलणारी कोण आहे? हे घर अरुंधतीचंदेखील आहे. ती कधी पण येथे येऊन राहू शकते.
सर्वजण अरुंधतीला घरी आणण्यासाठी प्लॅन करतात. हे पाहून संजना लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरवण्याचा विचार करत.
संजना मनातल्या मनात म्हणते की, मी जोपर्यंत या घरात येत नाही. तोपर्यंत अरुंधतीचं येथे येणं थांबणार नाही. मग कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही. मला न विचारता तिला येथे आणण्याची.
दरम्यान, डॉ. वसुधा अरुंधतीला सांगतात की, तिचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण, शस्त्रक्रिया केली पाहिजे.
अरुंधतीच्या ऑपरेशनला सुरुवात होते. शस्त्रक्रियेनंतर तिने कोणती काळजी घ्यावी, हेदेखील नंतर डॉक्टर अरुंधतीला सांगतात.
हे देखील वाचलंत का?