Latest

झायडस कॅडिला कोरोना लसीचे डिसेंबरपर्यंत ४ कोटी डोस

backup backup

झायडस कॅडिला या कंपनीची कोरोना लस झायकोव -डीला ( ZyCov-D ) भारतात आपत्कालीन वापरसाठी परवानगी मिळाली आहे. ही लस १२ वर्षाच्या पुढील मुलांना देण्यात येणार आहे. ही लस सुईद्वारे देण्यात येत नाही. झाडस कॅडिलाच्या लसीला परवानगी मिळाल्यामुळे भारतातील लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, झायडस कॅडिला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरवील पटेल यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीच्या लसीचे या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत  ३ ते ४ कोटी डोस तयार झालेले असतील.

पटेल म्हणाले की, मुलांसाठी आणि वृद्धांसाठी लसीच्या डोसचे नियम सारखेच असून आम्ही डोसचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आमच्याकडे ३० ते ५० लाख डोसचा साठा आहे. ते पुढे म्हणाले की, पुढच्या आठवड्यात झायडस कॅडिला झायकोव्ह – डी लस किती किमतीला मिळणार हे स्पष्ट होईल.

त्यानंतर सप्टेंबरपासून लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात होईल. ही लस तीन डोसची आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी आणि तिसरा डोस ५६ दिवसांनी देण्यात येणार आहे.

झायडस कॅडिला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरवील पटेल यांनी सांगितले की, आमच्या लसीची वयोमर्यादा १२ वर्षाच्या पुढची आहे. म्हणजे आमची लस किशोर वयाच्या मुलांनापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी देण्यात येणार आहे.

झायकोव्ह – डी लसीची चाचणी देशातील २८ हजार पेक्षा जास्त स्वयंम सेवकांवर करण्यात आली आहे. या चाचणीत ही लस ६६.६ टक्के प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे. ही लस २ डिग्री ते ८ डिग्री तापमानापर्यंत साठवता येते.

हेही वाचले का?

SCROLL FOR NEXT