जान्हवी कपूर स्टायलिश अदा, पण... | पुढारी

जान्हवी कपूर स्टायलिश अदा, पण...

पुढारी ऑनलाईन डेस्क

जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती आपले नवनवे लुक्स आणि फॅशनेबल ड्रेसिंगचे अनेक फोटो आपल्या अकाऊंटवरून शेअर करत असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच दोन व्हिडिओ शेअर केले आहे. मात्र या दोन्ही व्हिडिओत जान्हवी कपूरची चांगलीच फजिती झाली.

जान्हवी कपूर आपल्या पहिल्या व्हिडिओत स्टायलिश बिकीनी घालून एका ज्यूस मशिनमधून ज्यूस काढण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण, तिचे लक्ष ज्यूस काढण्यापेक्षा फोटोसाठी पोझ देण्याकडेच जास्त होते. त्यानंतर त्याच ज्यूस मशिनसोबत वेगळ्या अटायरमध्ये जान्हवी कपूरने दुसरा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती त्या ज्यूस मशिनमध्ये संत्रे टाकून ज्यूस काढण्याचा प्रयत्न करते. मात्र प्रयत्न करुनही त्या ज्यूसमधून ज्यूसच बाहेर पडत नाही.

या व्हिडिओला जान्हवी कपूरने अपेक्षा विरुद्ध वास्तव असे कॅप्शन दिले. जान्हवी कपूरचे हे दोन ज्यूस मशीन सोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. दुसऱ्या व्हिडिओत जान्हवी कपूर महत प्रयासाने काढलेला ज्यूस दाखवते आणि म्हणते ‘दिदी आज एवढेच मिळणार!’

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

गुड लक आणि तख्त मध्ये झळकणार

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ही रुही या चित्रपटात दिसली होती. त्यापूर्वी तिने गुंजन सक्सेना : द कार्गिल गर्ल या चित्रपटात गुंजन सक्सेनाची भूमिका पार पाडली होती. जान्हवी आता गूड लक आणि तख्त या चित्रपटात झळकणार आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली जान्हवी कायम आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. व्हेकेशनवरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.

हेही वाचलं का?

Back to top button