माजी मंत्री विनायक कुलकर्णी खून प्रकरणातून बाहेर आले अन्… कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला | पुढारी

माजी मंत्री विनायक कुलकर्णी खून प्रकरणातून बाहेर आले अन्... कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : खून प्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विनायक कुलकर्णी यांना आज जामीन मंजूर झाला. यानंतर बेळगावात त्याचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनी चन्नाम्मा चौकात राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. दरम्यान कुलकर्णी यांच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

कोरोनाच्या नियमांना धाब्यावर ठेवत माजी मंत्री विनायक कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार लक्ष्मी हेब्बळकर उपस्थित होत्या. त्यानंतर ते महामार्गाने धारवाडकडे रवाना झाले. हिंडलगा जेलमधून विनायक कुलकर्णी बाहेर येताच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांना राखी ही बांधली.

यावेळी सुवर्ण सौध शेजारी असलेल्या जैन बस्तीमध्ये ते दर्शनासाठी गेले. त्यांच्या कार्यकर्त्यानी याठिकाणी वाहने मोठ्या प्रमाणात लावल्याने महामार्ग सुमारे अर्धा तास ब्लॉक झाला होता. वाहनांना मार्ग मोकळे करून देताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.

Back to top button