Latest

जरीन खान हिचे ‘या’ बिग बॉस स्पर्धकासोबत गुटरगूsss

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री जरीन खान हिचे बिग बॉसमधील एका स्पर्धकासोबत गुटरगूsss असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, आहे-दोघांचे फोटो. जरीन खान आणि त्याचे गोव्यातले फोटो व्हायरल झाले आहेत. तो 'बिग बॉस' च्या १२ व्या सीझनमध्ये दिसला होता. त्याचे नाव आहे-शिवाशिष मिश्रा.

जरीनने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबत चित्रपट 'वीर'मधून केली होती. या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिची लुक्सची तुलना कॅटरीना कैफशी झाली होती.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या ते दोघे गोव्यात आहेत. शिवाशीष आणि जरीनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये जरीनने गोव्यातील सौंदर्याची झलक दाखवली होती. तिने काही दिवसांपूर्वी शिवाशीषसोबत फोटो शेअर केला होती. त्यावरून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समजले होते.

शिवाशीषने 'बिग बॉस १२' मध्ये सहभाग घेतला होता.

व्हिडिओमध्ये दिसली बॉन्डिंग

काही दिवसांपूर्वी दोघांचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये शिवाशीष हा जरीनला स्वीटी म्हणताना दित होता. फोटो आणि व्हिडिओजमध्ये दोघांमधील बॉन्डिंग स्पष्ट दिसत होती.

वाढदिवसादिवशी खास लिहिला खास मेसेज

शिवाशीषच्या वाढदिवसादिवशी तिने एक खास मेसज लिहिला होता. तिने लिहिलंय-'टेढ़ा है पर मेरा है. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा शिव. परमेश्वराचा आशीर्वाद नेहमी राहो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.' यासोबत तिने हार्ट इमोजी शेअर केला होता.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT