Latest

कारगिल विजय दिवस : पंतप्रधानांसह मान्यवरांची शहिदांना आदरांजली

नंदू लटके

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा: कारगिल विजय दिवस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या शहिदांना आदरांजली वाहिली. कारगिलमध्ये बहादुरी दाखविलेल्या सैनिकांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान प्रत्येकाला दरदिवशी प्रेरणा देते, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

अधिक वाचा 

'कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत भारतीय लष्कराच्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला आपण नमन करतो' असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सोशल मीडियाद्वारे नमूद केले आहे.

अधिक वाचा 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. 'कारगिल की चोटियों पे, दुश्मनों को हमने झुकाया है, हिन्द के वीरों ने, अपने लहू से तिरंगे को फहराया है', असे ट्विट भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे.

कारगिल विजय दिवसानिमित्त दरवर्षी कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये वॉर मेमोरियलमध्ये विशेष कार्यक्रम होतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सोमवारी हा कार्यक्रम झाला.

१९९९साली कारगिलच्या बर्फाळ डोंगरावर झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला पाणी पाजले होते. मे महिन्यात सुरु झालेली लढाई जुलै मध्ये संपली होती. २६ जुलै रोजी भारताने विजय घोषित केला होता.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ : पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

SCROLL FOR NEXT