न्यूयॉर्क : महाकाय बाह्यग्रहांत असू शकतो पृथ्वीसारखा ग्रह | पुढारी

न्यूयॉर्क : महाकाय बाह्यग्रहांत असू शकतो पृथ्वीसारखा ग्रह

न्यूयॉर्क : आपल्या ब्रह्मांडात पृथ्वीसारखे अनेक ग्रह असण्याची शक्यता आहे. आमच्या ‘मिल्की-वे’ नजीकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सूर्यमाला आहेत. त्यामध्ये असणार्‍या पृथ्वीसारख्या बाह्यग्रहाचा शोध घेण्यास शास्त्रज्ञ सध्या फारच उत्सुक आहेत. जेथे तरल स्वरूपात पाणी असेल आणि ते आपल्या तार्‍याभोवती फिरत असतील.

नव्या ‘कॉम्प्युटर सिम्युलेशन’मधून असे संकेत मिळत आहेत की, मिल्की वे नजीक असलेल्या परिसरात आपल्या पृथ्वीसारखा ग्रह असू शकतो. संशोधकांनी दोन तारे असलेल्या म्हणजे ‘बिनारी स्टार सिस्टीम’चा शोध लावला आहे. ही सिस्टीम आपल्या पृथ्वीपासून सुमारे 41 प्रकाशवर्षे दूर अंतरावर आहे. यास ‘55 कॅन्सरी’ असे नाव देण्यात आले आहे. दोन तार्‍यांच्या सिस्टीममधील प्रमुख तारा आपल्या सूर्यापेक्षा आकाराने लहान आहे. मात्र, आपल्या सूर्याच्या तुलनेत हा तारा लोहासारख्या अनेक धातूंनी समृद्ध आहे.

या कथित सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत. ‘55 कॅन्सरी’ नामक या सिस्टीममध्ये असे चार ग्रह आहेत की ते आपल्या सूर्य आणि पृथ्वीपेक्षा कमी अंतरावर स्थित आहेत. त्यानंतर तीन विशालकाय ग्रहसुद्धा आहेत. ज्यातील दोन ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा 50 पट जास्त वजनदार आहेत. तर, शेवटचा ग्रह आपल्या गुरू ग्रहापेक्षा चार पटीने जास्त वजनदार आहे आणि त्याची कक्षा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतरापेक्षा पाच पटीने जास्त आहे. मात्र, यासंदर्भात अजूनही संशोधन करणे बाकी आहे.

Back to top button