Latest

Actor Will Smith : १८ व्या वर्षी करोडपती होता स्मिथ, गर्लफ्रेंडशी रोमान्स करताना पकडला होता रंगेहात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑस्करचा पुरस्कार घेण्यापूर्वीच स्टेजवर गोंधळ घालणारा विस स्मिथ (Actor Will Smith) चर्चेत आला आहे. विल स्मिथच्या बायकोची चेष्टा करणाऱ्या निवेदकाला कानाखाली मारून त्याने आपला संताप व्यक्त केला. पण, तुम्हाला माहिती आहे का, पॉवरफुल विल स्मिथ खूप कमी वयापासून चर्चेत आला होता. कधी कोटींच्या संपत्ती वरून तर कधी अनेक महिलांसोबतचे संबंध. तर कधी आपल्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना. त्याच्या विषयी जाणून घेऊया या गोष्टी. (Actor Will Smith)

शिक्षण सोडले, संगीत क्षेत्रात करिअर

२५ सप्टेंबर १९६८ रोजी फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया येथे जन्मलेला विल स्मिथ हा एक प्रसिद्ध रॅपर आणि अमेरिकन अभिनेता आहे. त्याचे पूर्ण नाव विल्यम कॅरोल स्मिथ जूनियर आहे. शाळेत स्मिथच्या खोडकर वर्तनामुळे त्याला "प्रिन्स" असे टोपणनाव मिळाले होते. पुढे जाऊन ते "फ्रेश प्रिन्स" असे बदलले गेले. अभ्यासात रस नसल्यामुळे स्मिथचा गाण्याकडे कल वाढू लागला. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने रॅप करायला सुरुवात केली. स्मिथने गाण्यासाठी पुढील अभ्यास सुरू ठेवला नाही.

विल स्मिथ अफाट संपत्तीचा मालक

आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे हिट चित्रपट देणारा विल स्मिथ गेल्या २८ वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. विल स्मिथची एकूण संपत्ती सुमारे $३५० दशलक्ष (रु. २५०० कोटी) आहे. विलचे दोन वेळा लग्न झाले आहे. त्याने जेडा पिंकेट स्मिथशी दुसरे लग्न केले होते, जी आता विलची पत्नी आहे.

किचनमध्ये गर्लफ्रेंडसोबत पकडले होते आईने

हॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील असाच एक किस्सा शेअर केला आहे. त्याने सांगितले आहे की, एकदा तो त्याच्या मैत्रिणीसोबत किचनमध्ये रोमान्स करत होता, तेव्हा त्याची आई आली आणि त्याला पाहिलं. यामुळे तो इतका खजील झाला की अनेक दिवस तो आईच्या डोळ्यात डोळे भिडवू शकला नाही. तेव्हा ते १६-१७ वर्षांचा होता आणि त्याची मैत्रीणही त्याच वयाची असावी. विलला एक मुलगी शाळेत भेटली. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी रात्री भेटण्याचा प्लॅन बनवला. मुलगी विलच्या घरी आल्यावर स्वयंपाकघर सुरक्षित असल्याचे समजून दोघांनीही रोमान्स सुरू केला. विलचे नशीब खराब होते की त्याच्या आईचे डोळे उघडले आणि ती काहीतरी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली. आपण एकमेकांत हरवलो आहोत हे त्याला कुठे दिसले. विल म्हणाला की, आई परत गेली पण अनेक महिने ती विसरू शकली नाही.

एकदा गाताना त्याची भेट जेफ्री अॅलन टाऊन्सशी झाली. पुढे दोघांनी एकत्र करिअर केले. जेफ्रीने त्याचे नाव बदलून 'डीजे जॅझी जेफ' आणि स्मिथने 'प्रिन्स' केले. १९८६ मध्ये 'गर्ल्स इन नथिंग' हे गाणे त्याचे पहिले हिट ठरले.

१८८७ मध्ये, स्मिथचा पहिला अल्बम 'रॉक द हाऊस' प्रचंड यशस्वी झाला. या अल्बमने स्मिथला केवळ प्रसिद्धीच नाही तर संपत्तीही मिळवून दिली. स्मिथ वयाच्या १८ व्या वर्षी करोडपती झाला होता. १९८८ मध्ये 'पॅरेंट्स जस्ट डोन्ट अंडरस्टँड'साठी त्याला पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. स्मिथ पहिल्यांदा 'मेड इन अमेरिका'मध्ये दिसला होता. या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा खूपच छोटी होती. यानंतर त्याने बॅड बॉईजमध्ये पोलिसाची भूमिका साकारली.

१९९७ मध्ये 'मॅन इन ब्लॅक' आणि १९९८ मध्ये 'एनिमी ऑफ द स्टेट'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २००१ मध्ये, बॉक्सर मोहम्मद अलीच्या बायोपिक 'अली'साठी त्याला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २००४ में 'रोबॉट' आणि २००५ मध्ये 'हिच' यशस्वी ठरला. २००६ मध्ये, द पर्स्युट ऑफ हॅपीनेस मधील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता अकादमी पुरस्कारासाठी पुन्हा नामांकन मिळाले होते. २०१६ मध्ये आलेला 'सुसाइड स्क्वॉड' त्याच्या जीवनातील सर्वात हिट झालेला चित्रपट ठरला.

हेदेखील वाचा –

SCROLL FOR NEXT