Latest

Alcohol and Human : लोकं दारू का पितात? गुंगीत राहणार्‍या माकडाच्‍या प्रजीतीवर होणार संशोधन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पनामामध्‍ये माकडाची प्रजाती आहे. याला ब्‍लॅक हेडेड स्‍पायडर असे म्‍हटलं जातं. त्‍याचे आवडते खाद्‍य हे पाम फूड असून, ही प्रजाती पाम फूडचे सेवन एवढ्या मोठ्या प्रमाणावर करते. यामुळे या प्रजातीमधील माकडे ही नेहमीच गुंगीत राहतात. सतत झोपणारे माकडे, अशीही त्‍यांची ओळख आहे. ही माहिती देण्‍याचे कारण म्‍हणजे, ब्‍लॅक हेडेड स्‍पायडरवरुन वैज्ञानिकांना मानवाची आठवण झाली. माणसाला दारु का आवडते, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्‍यासाठी ते या माकड प्रजातीच्‍या सवयींचा अभ्‍यास करणार आहेत. यावरुन लोकं दारू का पितात? याचे उत्तर मिळेल, असा विश्‍वास वैज्ञानिकांना व्‍यक्‍त केला आहे. ( Alcohol and Human)

ब्‍लॅक हेडेड स्‍पायडर खातात गुंगी येणारी फळे

केवळ ब्‍लॅक हेडेड स्‍पायडर या प्रजातीलाच अशा गुंगी येणार्‍या फळ आवडीने खातात, असे नाही तर माकडांच्‍या अनेक प्रजाती या विविध फळे आणि झाडांची पाने खावून गुंगीत राहणे पसंद करतात. पाम फ्रूटमध्‍ये अल्कहोल अल्‍प प्रमाण असते, हे वैज्ञानिकांना ब्‍लॅक हेडेड स्‍पायडरच्‍या लघवीचे नमून्‍यात आढळून आले. मात्र या फळाचे अधिक सेवन केल्‍याने माकडांना गुंगीच येते. तसेच त्‍याची झोपही चांगली होते, असे निरीक्षण स्‍टडी रॉय सोसायटी ओपन सायन्‍स जनरलमधील प्रकाशित लेखात म्‍हटलं आहे.

या संशोधनासंदर्भात माहिती देताना कॅलिफोर्निया विद्‍यापीठाच्‍या संशोधक क्रिस्‍टीना कॅपबेल यांनी सांगितले की, जंगलात वास्‍तव्‍यास असणारे माकडाची प्रजाती या विशिष्‍ट्य अशा फळांचे सेवन करतात आणि गुंगीत राहतात, हे आम्‍ही प्रथम सिद्‍ध केले. या प्रजातीचे माकड फळे चवीने खाते. गुंगी येणार्‍या फळाचे अतिरिक्‍त सेवन करत ती नेहमीच गुंगीतच राहतात, असा अंदाज याच विद्‍यापीठातील जीवशास्‍त्राचे प्राध्‍यापक रॉबर्ट डडले यांनी २२ वर्षांपूर्वी व्‍यक्‍त केला होता. माकडांना कोणत्‍या फळामध्‍ये अल्कहोल आहे, याची माहिती फळ चाखून मिळते, असेही निरीक्षण त्‍यांनी नोंदवले होते.

Alcohol and Human : माकडं असतात गुंगी आणणार्‍या फळांच्‍या शोधात!

माकड हे गुंगी आणणार्‍या फळांच्‍या शोधातच असतात. त्‍यांना अशा फळाची आवड असते. मानवालाही दारु पिणे आवडते. मात्र मानवाने कधीच फळांमधील पोषक तत्‍वांकडे पाहिले नाही. केवळ स्‍पिरिट कसे काढावे हेच तो शिकला. माकड असे करत नाही. फळ सेवनास योग्‍य झाल्‍यानंतर ते खाते. माकडाची सर्वात हुशार प्रजाती चिम्‍पाजीही पाम झाडातून निघणार्‍या रसाचे प्राशन करते. या झाडांमधील रसाचे परीक्षण करण्‍यात आले. यामध्‍ये ७ टक्‍के अल्‍कोहल असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

ब्‍लॅक हेडेड स्‍पायडर प्रजातीवर अल्‍कोहलचा कोणता प्रभाव होता याचा अभ्‍यास क्रिस्‍टीना आणि तिच्‍या टीमने केला. यावेळी स्‍पष्‍ट झाले की, बंदीस्‍त जागेत असलेल्‍या माकडाने सुरुवातीला या फळांमधून येत असलेल्‍या वासापासून स्‍वत:ला लांब केले. मात्र जेव्‍हा या प्रजातीच्‍या माकडांना जंगलात सोडले त्‍यावेळी त्‍यांनी स्‍वत: जावून पाम फ्रूटचे सेवन केले. फळांवरील संशोधनातून मानवही दारु का पित असेल, असा खुलासा होईल, असा वैज्ञानिकांना विश्‍वास वाटत आहे.

क्रिस्‍टीना हिने सांगितले, माकड हे अल्‍प प्रमाणात अल्कहोल असणारी फळे ही चांगल्‍या कॅलरजीसाठी खाते. मध्‍य आणि दक्षिणी अमेरिकामध्‍ये पाम फ्रूट हे आदिवासी आणि स्‍थानिक लोक मोठ्या चवीने खातात. या फळांचा प्रयोग मानवावर केला तर तोही गुंगीतच राहिल. उक्रांती नियमानुसार माकडाकडूनच ही गुंगीत राहण्‍याची ( दारु पिण्‍याची) आवड हीच मानवात आली असावी. दारु आवडणे हे प्राण्‍याच्‍या डीएनएमधून मानवच्‍या डीएनएमध्‍ये आले असावे. सस्‍तन प्राण्‍यांमध्‍ये हे आता सिद्‍ध होत आहे. मानव, चिम्‍पांजी, बोनोबोस आणि गोरिलाच्‍या गुणसूत्राचे म्‍यूटेशनमध्‍ये समानता असल्‍याचेही यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे आता ब्‍लॅक हेडेड स्‍पायडरच्‍या आहारातून लोकं दारू का पितात? या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT