Latest

Nithya Menon : कोण आहे ‘भीमला नायक’ची ही अभिनेत्री?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती स्टारर 'भीमला नायक' चित्रपट २५ फेब्रुवारीला रिलीज झालाय. टॉलीवूड बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत वर्ल्‍डवाईड १०० कोटींचं कलेक्शन तर ५ दिवसांत या चित्रपटाने १५० कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन केलं होतं. या कलेक्शनमध्ये तेलुगू राज्यामध्ये ७६.५ कोटी तर कर्नाटकात १०.६ कोटी रुपयांची कमाई केली. 'भीमला नायक'ने परदेशात १५.४ कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटात पवन कल्याण, राणा दग्गुबाती, निथ्या मेनन (Nithya Menon) आणि संयुक्ता मुख्य भूमिकेत आहेत. तुम्हाला माहितीये का, निथ्या मेनन कोण आहे? निथ्याने जय भीम फेम अभिनेता सूर्यासोबत हिट चित्रपट दिला आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी… (Nithya Menon)

Nithya Menon
Nithya Menon

भीमला नायक चित्रपटाचे दिग्दर्शन सागर के चंद्रा यांनी केलं आहे. यामध्ये निथ्या मेनन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २-०२०२ चा सुपरहिट मल्याळम चित्रपट 'अय्यप्पनम कोशियुम'चा अधिकृत रीमेक आहे.

Nithya Menon

कोण आहे निथ्या मेनन?

निथ्या साऊथ अभिनेत्री आहे. तिचा जय भीमचा अभिनेता सूर्यासोबतचा '२४' हा चित्रपट गाजला होता. ती एक गायिकादेखील आहे. डबिंग कलाकार म्हणूनही तिची ओळख आहे. तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. निथ्या एक मल्याळम कुटुंबातील आहे. तिने मणिपाल विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवलीय.

Nithya Menon
Nithya Menon

तिला कधी अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला पत्रकार व्हायचं होतं. पण, तिला चित्रपट विश्वात सहभागी होण्याची संधी मिळाली. यासाठी निथ्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातून सिनेमॅटोग्राफीचा कोर्स केला.

Nithya Menon
Nithya Menon

निथ्याचा जन्म ८ एप्रिल, १९८८ रोजी बंगळूर, कर्नाटकमध्ये झाला. दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांनी तिला आपल्या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकर म्हणून काम केले होते. तिने इंग्रजी चित्रपट द मंकी हू नॉट टू मच १९९८ मध्ये काम केले. तिने २००१ मध्ये टीव्ही मालिका छोटी मां एक अनोखा बंधन मधून अभिनयाला सुरुवात केली. २००५ मध्ये कन्नड चित्रपट, सेव्हन ओ क्लॉक मधून तिने चित्रपट करिअरला सुरुवात केली होती. तिने हिंदी चित्रपट २०१९ मध्ये मिशन मंगलमधून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Nithya Menon

तिने आकाश गोपुरम, जोश, वेलातूव्ल, केरला कॅफे, एंजेल जॉन, अपूर्वरागम, अनवर, ऐडोण्डला ऐडु, ऐला मोडलैंडी, उरूमी, नूत्रीएंबधू, वायलिन, वेप्पम, मकरमंजू, इश्क, कर्मयोगी, उस्ताद हॉटेल यासारख्या अनेक तमिळ, तेलुगु आण मल्याळम चित्रपटांत काम केले आहे.

Nithya Menon

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT