HBD Shraddha : श्रद्धा कपूरच्या घरातलं मराठी वातावरण आहे तरी कसं? | पुढारी

HBD Shraddha : श्रद्धा कपूरच्या घरातलं मराठी वातावरण आहे तरी कसं?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज ३ मार्चला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचं (HBD Shraddha) वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का? श्रद्धा कपूरचे वडील अभिनेते शक्ती कपूर हे पंजाबी आहेत तर आई शिवांगी कोल्हापूरे या मराठी आहेत. (HBD Shraddha) या दोघांच्या लग्नाचा किस्सा अनोखा आहे. ते आपण पुढील माहितीत पाहणारचं आहोत. पण, त्याआधी श्रद्धाच्या घरातलं मराठी वातावरण कसं आहे? ते पाहुया. कारण, श्रद्धा ही आपल्या आईमुळेच खूप छान मराठी बोलते. त्यामुळे तिची आई आणि श्रद्धा या दोघींच्या मध्ये मात्र शक्ती कपूर यांचा चांगलाच गोंधळ होतो.

shraddha kapoor
shraddha kapoor

शक्ती कपूरने ठरवलं होतं या मराठी मुलीशीच लग्न करेन

चित्रपट इंडस्ट्रीत येण्यासाठी शक्ती यांनी दिल्लीतून शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली. १९८२ मध्ये त्यानी शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केलं. शिवांगी कोल्हापुरे केवळ श्रद्धाची आईचं नव्हती तर त्या एक प्लेबॅक सिंगर आणि अभिनेत्रीही होत्या. त्यांनी १९८६ मध्ये किस्मत चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. दो अनजाने, विधाता असेहीत्यांनी चित्रपट केले.

shraddha kapoor
shraddha kapoor

वयाच्या १८ व्या वर्षी शिवांगी यांनी पळून जाऊन शक्ती कपूर यांच्याशी कोर्टात लग्न केलं. लग्नानंतर त्या चित्रपटापासून दूर गेल्या. शक्ती आणि शिवांगी यांची भेट किस्मत चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाली होती. शिवांगी कोल्हापुरे यांची सख्खी बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी या बिझी असल्यामुळे किस्मतच्या निर्मात्याने शिवांगी यांना चित्रपटात साईन केलं. त्यावेळी शक्ती हे शिवांगी यांच्या प्रेमात पडले होते. शिवांगी कोल्हापुरेच्या परिवाराला शक्ती कपूर आवडत नव्हते. शक्ती कपूरसोबत लग्न करणं शिवांगी यांच्यासाठी सोपं नव्हतं.

shraddha kapoor
shraddha kapoor

असं आहे श्रद्धाच्या मराठी घरातलं वातावरण

श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे मराठी आहे. तर श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे पंजाबी कुटुंबातील आहेत. पण, जेव्हा मराठी बोलण्याचा प्रश्न येतो, तेव्हा शक्ती यांची चांगलीच फजिती होते. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये शक्ती म्हणाले होते की, श्रद्धा आणि तिच्या आईला खासगी किंवा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं असतं तेव्हा दोघी मराठीमध्ये बोलतात. त्यामुळे माझा चांगलाचं गोंधळ होतो. मला तसं फारसं मराठी बोलता येत नाही. पण, मला थोडी थोडी मराठी समजते.

shraddha kapoor

श्रद्धा मराठी बोलण्याविषयी म्हणते, माझे आजोबा खूप मोठे क्लासिकल सिंगर होते. आई, भाऊ आणि माझ्यासाठी गाणं खूप महत्त्वाचं आहे. आई मराठी असल्यामुळे घरात मराठी वातावरण आहे. माझा भाऊ सिद्धांत कपूरदेखील चांगलं मराठी बोलतो. हसीना पारकर चित्रपटाच्या प्रमोशवेळीही ती उत्तम मराठी बोलली होती. त्याच शिवाय ती रशियन भाषाही चांगल्या प्रकारे बोलू शकते. वेळोवेळी श्रद्धा मराठी बोलताना दिसते. तिचे मराठी बोलतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

shraddha kapoor

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button