Latest

कर्नाटक सीमेवर शिवसेनेचे जोरदार आंदोलन, कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे आणि ध्वजाचे दहन

backup backup

सांगली; स्वप्निल पाटील : बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याने कर्नाटक सीमेवर म्हैसाळ येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तसेच कर्नाटक सरकारच्या ध्वजाची होळी करण्यात आली.

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मिरज, कोल्हापूर, पुणे येथे शिवसेनेने जोरदार आंदोलन केले होते. यावेळी मिरजेत शिवसेनेकडून कर्नाटकमधील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. नंतर कर्नाटकात देखील कर्नाटक रक्षणा वेदिके या कन्नडिगाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा चिघळला होता.

यानंतर मंगळवारी पुन्हा बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक सीमेवर म्हैसाळ येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तसेच कर्नाटकच्या ध्वजाची होळी केली. यापुढे असा प्रकार घडल्यास शिवसेना कर्नाटकात घुसून महाराष्ट्राचा हिसका दाखवेल असा इशारा यावेळी मिरज शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे यांनी दिला.

यावेळी मिरज शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, कर्नाटकचे पोलिस उपअधीक्षक गिरीष, उप निरीक्षक रबकवी यांच्याकडून सीमेवर दोन्ही बाजूस मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT