नाशिक : लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकाला एसीबी ने केली अटक | पुढारी

नाशिक : लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकाला एसीबी ने केली अटक

येवला, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामसेवक महेश सुरेश महाले (वय ३२) याला लाच मागणी केल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत निमगावमढ  येथे जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे. तरीही ग्रामसेवक महेश महाले यांनी तक्रारदार-ठेकेदार यांनी केलेल्या स्मशानभूमीच्या कामाचे बील मंजूर झाल्याच्या मोबदल्यात तसेच तक्रारदार यांची अनामत रक्कम परत करण्यासाठी सुरवातीला ८० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केली.

त्यानुसार नाशिक लाचलुचपत विभागाचे पथकाने मंगळवार ता. २१ रोजी संबंधित ग्रामसेवकास भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशाच्या स्वरुपात लाभ मिळण्याची व्यवस्था करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्याने अटक केली.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र अधिक्षक पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक अभिषेक पाटील,  पोलीस निरीक्षक मिरा आदमाने, पोलिस हवालदार सुखदेव मुरकुटे, विनोद पवार, संतोष गांगुर्डे, मनोज पाटील, प्रवीण महाजन यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button