मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भास्कर जाधव यांनी विधानसभेत सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेत नक्कल केली. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. याप्रकरणी भास्कर जाधव यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या मागणीवर विरोधी पक्षाचे सदस्य ठाम राहिले. यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ झाला.
मी माझे शब्द मागे घेतो, असे भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितले. मात्र याप्रकरणी अद्याप गांभीर्य नाही, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी त्यांनी तत्काळ माफी मागावी, या मागणीवर विरोधी पक्षाचे सदस्य ठाम राहिले. यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ झाला. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केले.
हेही वाचलं का?