मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकने अचानक घेतला पेट | पुढारी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकने अचानक घेतला पेट

कासा (डहाणू), पुढारी वृत्तसेवा : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागली. ट्रकने क्षणार्धात आगीने राैद्ररूप धारण केले. त्वाहनचालकाने ट्रक महामार्गांवरच उभा करून उडी घेऊन आपला जीव वाचवला. काही काळातच ट्रक जळून खाक झाला.

या ट्रकमध्ये प्लास्टिक दाणे भरलेले असल्याने आग जोरात पसरली. यामुळे महामार्गावर दुतर्फा मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली. महामार्ग व कासा पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाेलिस  वाहतूक कोंडी सोडवीत आहेत. जवळ अग्निशमन यंत्रणा नसल्याने डहाणू, बोईसर येथून अग्निशमन दल पोहोचेपर्यंत ट्रक जळून खाक झाला. कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

हेही वाचलं का? 

Back to top button