Latest

Uttarakhand election : उत्तराखंडमध्ये भाजपा इतिहास बदलणार?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यांपासूनच उत्तराखंड विधानसभेवर भाजप आघाडीवर आहे. आकडेवारीचा अंदाज घेता, एकूण ७० जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेत ४३ जागांवर भाजप आपले स्थान निर्माण करताना दिसत आहे. सुरूवातीपासूनच सर्वच मतदारसंघात सत्ताधारी पक्ष भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांवर बहुमत मिळवत, भाजप पक्ष उत्तराखंडचा इतिहास बदलत असल्याचे दिसत आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंतच्या निवडणुक निकालावर नजर टाकली, तर उत्तराखंड विधानसभेवर काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर होती, तर बसपा आणि अपक्ष उमेदवारांना दोन जागा मिळाल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यात लालकुआं विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत सात हजार मतांनी पिछाडीवर होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जवळपास ९०० मतांनी पिछाडीवर होते. पण आत्ताच्या आकडेवारीनुसार आपापल्या मतदारसंघातून आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे.

२०१७ मध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजपने तीन मुख्यमंत्री बदलले असले तरी, शासन आणि विकासाच्या नावाखाली मतदारांनी पहिली पसंती हि भाजपलाच राहील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले, तर उत्तराखंडच्या २० वर्षातील इतिहासातील ही पहिलीच घटना असेल, की एखादा राजकीय पक्ष पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर पुन्हा आपले सरकार स्थापन करत आहे. या आकडेवारीनुसार हे यश भाजपच्या पारड्यात पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT