पणजी : पुढारी वृत्तसेवा : उत्तर गोव्यातील २० मतदारसंघाची मतमोजणी होत असलेल्या अल्तीन्हो पणजी येथील सरकारी पॉलिटेक्निक इमारतीसमोर विविध पक्षाच्या समर्थक कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या तीन ते चार फेऱ्या संपलेल्या आहेत. एकूण सात ते आठ फेऱ्या विविध मतदारसंघात होणार आहेत.
पहिल्या ,दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत जे जे उमेदवार आघाडीवर येतात त्यातील काहीजण पुढील फेरीमध्ये मागेही पडत पडत आहेत त्यामुळे निकालात चढ-उतार जाणवत असल्यामुळे कार्यकर्ते काही वेळा उत्साही तर काही वेळा नाराज दिसत आहेत .मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून वाहनांची प्रचंड कोंडी मतमोजणी केंद्राच्या बाहेर झालेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून पहिला फेरीअखेर पिछाडीवर होते मात्र तिसऱ्या फेरीत त्यानी सुमारे दोनशे मताची आघाडी घेतली आहे.
उपमुख्यमंत्री असलेले बाबू आजगावकर आणि बाबू कवळेकर हे ही अनुक्रमे मडगाव आणि केपे मतदारसंघातून पिछाडीवर आलेले आहेत. पणजी मतदारसंघात विद्यमान भाजपाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपली आघाडी तिसऱ्या फेरीनंतर वाढवली आहे. त्याचबरोबर पर्वरीत रोहन खंवटे यांनी आपले आघाडी तिसऱ्या फेरीअंती पर्यंत कायम ठेवलेली दिसून येते. कळंगुट मध्ये काँग्रेसचे मायकल लोबो यांनी ही आपली आघाडी कायम ठेवलेली आहे.
दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे . मतमोजणीच्या बाहेर नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे नेटवर्कची समस्या ही जाणवत असून बहुतांश लोक मोबाईलवर येणाऱ्या अपडेट कडे लक्ष ठेवून आहेत. भाजपचे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत असून कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असले तरी घोषणा देत नाहीत.