#UttarPradeshElections : अब योगी योगी कहना है ! | पुढारी

#UttarPradeshElections : अब योगी योगी कहना है !

ग्राऊंड रिपोर्ट : दिगंबर दराडे : हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊँचा जाना है, एक भारत नया बनाना है उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे ट्विट करून यूपीकरांना चुचकारले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद योगींच्या पाठीशी असल्याने त्यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारल्याचे दिसत आहे. राम मंदिरापासून ते गंगेच्या घाटापर्यंत. गंगेच्या घाटापासून ते वाराणसी एअरपोर्ट पर्यंत.. घराणेशाहीला विरोध करत.. हिंदुत्वाचा नारा देत.. विकास म्हणजे मोदी..आणि मोदी म्हणजेच विकास.. असे आराखडे या निवडणुकीमध्ये आखण्यात आले. पहिल्या असले पासूनच मोदींनी उत्तर प्रदेशसाठी डबल इंजिनचे सरकार द्या असे आव्हान येथील जनतेला केले होते. या आव्हानाला साथ देत यूपी मे रहना है तो योगी योगी कहना है हा नारा खरा केल्याचे आज स्पष्ट होत आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही प्रयागराज, वाराणसी, अयोध्या या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट मांडला. सर्वात प्रथम मोदी यांची काशी विश्वेश्वराबद्दल असलेली श्रद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. हिंदुत्व आणि काशी यांची सांगड घालत मोदीने ही निवडणूक आपल्या हातात ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवस दिवस सभा करत योगी आणि मोदींनी संपूर्ण 75 जिल्ह्यांचा उत्तर प्रदेश पिंजून काढला. संध्याकाळच्या सभेच्या वेळी मोदींना बोलताना प्रचंड त्रास होत असताना देखील त्यांनी आपली पक्कड कमी होऊ दिली नाही.

योगी आणि मोदींची समय सूचकता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. जेव्हा मोदीनी वाराणसीमधून निवडणूक लढवली. त्यावेळी मोदींनी गंगा मा ने बुलाया है.. अशी आर्त हाक यूपीकरांना टाकली होती. या हाकेला लोकांनी मनापासून साथ दिली होती. यावेळी देखील योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून संसद रहायचे. योगी आदित्यनाथ यांचे मुळ नाव अजय सिंह बिष्ट आहे. ते गोरखपूर येथील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराचे महंत आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत भारतात योगी आदित्यनाथ यांचा देशातील पहिल्या पाच नेत्यांमध्ये समावेश आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button