Bhagwant Singh Mann : 'आप'चा झाडू ७० वर्षांची घाण साफ करेल : भगवंत मान | पुढारी

Bhagwant Singh Mann : 'आप'चा झाडू ७० वर्षांची घाण साफ करेल : भगवंत मान

पुढारी ऑनलाईन डेस्क:
 
 आम आदमी पार्टीचा  झाडू पंजाबमधील ७० वर्षांची जी काही घाण आहे ती साफ करेल. ज्या चुका या अगोदर केल्या आहेत त्याच्यापासून आम्ही खुप गोष्टी शिकलो. या चुका मान्यही करतो. पंजाबमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी स्व:र्चाने प्रचार केला आहे. त्यांचा मी आभारी आहे, असे आम आदमी पार्टीचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी म्‍हटलं अआहे.  

सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे  फोटो नाही

 
पंजाबमध्ये  ६६ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ११७ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात  झाली आहे. लवकरचं  लक्ष वेधुन राहीलेल्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये आम आदमाी पार्टीची सत्ता येण्‍याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत  मान  (Bhagwant Singh Mann) यांनी तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राज्‍यात आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेत आल्‍यास सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो असणार नाही. सर्व सरकारी कार्यालयात शहदी भगतसिंग आणि  भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. 
हेही वाचलतं का?

Back to top button