Latest

युक्रेनची प्रसिध्द अभिनेत्री Oksana Shvets चा रशियाच्या रॉकेट हल्ल्यात मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

कीव्ह : पुढारी ऑनलाईन

युक्रेनची अभिनेत्री Oksana Shvets चा रशियाच्या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कीव्ह येथे तिचा राहत्या घरातच मृत्यू झाला. ओक्सानाच्या मृत्यूची पुष्टी करताना, यंग थिएटरने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "कीव्हमधील निवासी इमारतीवर झालेल्या रॉकेटच्या हल्ल्यात, युक्रेनची एक कलाकार ओक्साना श्वेट्स ठार झाली."

हॉलिवूड रिपोर्टनुसार, ओक्साना ६७ वर्षांच्या होत्या. त्यांना युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'युक्रेनचे सन्मानित कलाकार' असे साधारणपणे त्याचे टायटल आहे.

२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केलीय. हे युध्द अद्यापही थांबलेले नाही. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, विशेष मोहीम केवळ युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या मते, युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून जवळजवळ ६०० नागरिक मारले गेले आहेत आणि १ हजारहून हून अधिक जखमी झाले आहेत.

SCROLL FOR NEXT