Crude Oil : रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्यास भारत तयार? | पुढारी

Crude Oil : रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्यास भारत तयार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने रशियाकडून अनुदानित दरानुसार तेल खरेदी (Crude Oil) करणे, नाकारले नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, “युरोपीय देश अजूनही रशियाकडून तेल आयात करत आहे. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसलेला आहे. पुतीन यांच्या युद्धात्मक धोरणांमुळे हे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत माॅस्कोने नवी दिल्लीला कच्चे तेल आणि इतर वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.”

बागची यांनी सांगितले की, “भारताने अनुदानित दरांनुसार कच्चे तेल घ्यावे, असा प्रस्ताव दिलेला आहे. गरजेनुसार भारत कच्च्या तेलांची आयात करत असतो. त्यामुळे भारत कायमच जागतिक ऊर्जा बाजारातील सर्व शक्यता तपासून घेत असतो. कारण, अशा परिस्थितीत भारताला कच्च्या तेलाच्या गरजेच्या पूर्ततेसाठी आयात प्रक्रियेत विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे”, असेही अरिंदम बागची यांनी सांगितले.

“भारत तेल आयातीत प्रमुख देश आहे. त्यामुळे आज निर्माण झालेल्या परिस्थितीत भारत सर्व पर्यायांचा विचार करत आहे. रशियाच्या विरोधात पश्चिमी देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या कारभारावर परिणाम होत आहे. या निर्बंधांमुळे भारत आणि रशिया यांच्या आर्थिक संबंधांंवर निर्णाम होणाऱ्या परिणामांचा विचार सध्या आम्ही करत आहोत”, अशी माहिती अरिंदम बागची यांनी दिली.

पहा व्हिडिओ : “मी शाहरुख खानसोबत मुव्ही साईन करेन” – अमृता खानविलकर रॅपिड फायर

Back to top button