Latest

Turmeric reduce Cholesterol : हळदीमुळे कमी होईल शरीरातील कोलेस्टेरॉल, जाणून घ्या कसे?

Arun Patil

नवी दिल्ली : 'पी हळद आणि हो गोरी…' असे म्हटले जाते. खरे तर प्राचीन काळापासून हळदीचा (Turmeric reduce cholesterol) वापर आरोग्यासाठी केला जातो. हळदीचे बरेच फायदे आहे. आयुर्वेदातही हळदीला विशेष महत्त्व आहे. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो.

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळद (Turmeric reduce cholesterol) खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद ही कर्करोग आणि मधुमेह यासारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते.

शरीरात उच्च कोलेस्टेरॉल म्हणजे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंत कोणत्याही गोष्टीचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत हळदीसोबत कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी अभ्यास आणि संशोधन केले गेले आहेत. प्राणी आणि मानवावर केलेल्या संशोधनानुसार, हळदीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर तीन प्रकारे परिणाम होतो. रक्तातील उच्च कोलेस्टेरॉलसह (Turmeric reduce cholesterol) उच्च ट्रायग्लिसराईडची पातळी हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. ट्रायग्लिसराईडदेखील धमन्यांमध्ये तयार होते, त्यामुळे रक्ताभिसरण समस्या निर्माण होते. हळदीच्या वापराने ट्रायग्लिसराईडचे प्रमाण नियंत्रित करता येते. हळदीमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज भाज्यांमध्ये हळदीचा पुरेसा वापर करणे नेहमीच श्रेयस्कर ठरते.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT