[tie_slide] बातमी 1 | नगर : अपहृत मुलीसह आरोपीला केले जेरबंद[/tie_slide]
[tie_slide] बातमी 2 | नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड [/tie_slide]
[tie_slide] बातमी 3 | पुणे जिल्ह्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार यांच्याकडे[/tie_slide]
[/tie_slideshow] पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायांमधील रक्तरंजित संघर्ष सुरुच आहे. थौबल जिल्ह्यात जमावाने ( Manipur security camp) भारतीय राखीव बटालियनच्या छावणीतून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गाेळीबारात एका तरुण ठार झाला.
या घटनेबाबत भारतीय लष्कराने निवेदनात म्हटले आहे की, सैन्याच्या हालचाली रोखण्यासाठी जमावाने रस्ता अडवला. मंगळवारी सायंकाळी शस्त्रे आणि दारूगोळा लुटण्यासाठी थौबल जिल्ह्यात खंगाबोक भागातील 'आयआरबी' बटालियनच्या कॅम्पवर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. प्रथम अश्रुधुराच्या गोळ्या आणि रबर गोळ्यांचा वापर केला. सशस्त्र जमावाने गोळीबार सुरू केल्याने जवानांनी त्याला सडेताेड प्रत्युत्तर दिले. गाेळीबारात एक तरुण ठार झाला. आसाम रायफल्स आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, छावणीकडे जाणाऱ्या आसाम रायफल्सच्या पथकावर जमावाने हल्ला केला. यावेळी आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला. यामध्ये जवान जखमी झाला आहे.
मणिपूरमध्ये 3 मे पासून व्यापक संघर्ष पहायला मिळत आहे, जेव्हा मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन (ATSUM) ने मैतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती राज्याच्या मागणीच्या निषेधार्थ काढलेल्या कुकी एकता मोर्चाने हिंसक वळण लागले. गेली दोन महिने राज्यात हिंसाचाराचे सत्र सुरुच राहिले आहे. आतापर्यंत 100 हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. हजारो नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. मणिपूरच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटनांसह परिस्थिती तणावपूर्ण होती, असे राज्य पोलिसांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. सुमारे ११८ चेक-पॉईंट उभारण्यात आले आहेत. हिंसाचार सुरूच राहिल्याने राज्यभरात ३२६ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा :