पुणे जिल्ह्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार यांच्याकडे | पुढारी

पुणे जिल्ह्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार यांच्याकडे

पुणे: पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी चे आमदार दिलीप मोहिते, जुन्नर चे अतुल बेनके, मावळचे सुनील शेळके,इंदापूरचे दत्तात्रय भरणे हे आमदार अजित पवार यांच्या गटात गेले आहेत तर आंबेगाव- शिरूर चे दिलिप वळसे पाटील यांनी यापूर्वीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्यातील फक्त शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या कडे राहीले आहेत.

त्यांनी सकाळी मुंबई शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली देवगिरी बंगल्यावर ज्या निवेदनावर सह्या घेतल्या ते वाचले नव्हते असे अशोक पवार यांनी यावेळी म्हटले आहे. तर आमदार अतुल बेनके अजित पवार बरोबर गेले असले तरी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जुन्नर तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसते.

हे ही वाचा : 

पुणे : अंदाजासाठी अजित पवार समर्थक कराड दौर्‍यात सहभागी !

आमदार सरोज अहिरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर घेणार निर्णय

Back to top button