Latest

shivani baokar : शीतलीचा एक भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल (Video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन; मराठीमोळी अभिनेत्री शिवानी बावकर ( shivani baokar ) हिचा 'लागिरं झालं जी' ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील शिवानीची शीतलीची भूमिका चाहत्याच्या पसंतीस उतरली आहे. सध्या शीतलीचा एक भन्नाट डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकतेच शिवानी बावकरने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक हटके फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केला असून यात खूपच ग्लॅमरस दिसत आहे. याशिवाय तिच्या मोकळ्या केसांनी तिच्या सौदर्यांत आणखी भर पडली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'जोपर्यंत स्वत:ला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका ?'असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेंन्टचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'मनमोहक रूप', 'अप्रतिम दिसतेस', 'ग्लॅमरस', 'सुंदरता ठासून भरलेली आहे'. तर दुसऱ्या एकाने 'काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहेस. जसा कोळशाच्या खाणीतून हिरा बाहेर आला.' असे म्हटले आहे.

याशिवाय शिवानीचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती 'खो गयी मैं' या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशाली यांनी हे गाणं गायिले आहे. या गाण्यातील काही हुक स्टेप सध्या ट्रेंडवर असून याचे रिल्स बनविले जात आहेत. या व्हिडिओत शिवानीने पांढऱ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी खूपसाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या डान्सला चाहत्यांनी भऱभरून प्रतिक्रियी देत तिच्या सौदर्याचे कौतुक करत आहेत.

शिवानी बावकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून नेहमी आपले हटके फोटो शेअर करत असते. छोट्या पडद्यावरील 'लागिरं झालं जी' ही मालिका सध्या संपली आहे. पंरतु, शिनावीची नविन 'कुसुम' मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील तिची भूमिकादेखील चाहत्याच्या पसंतीस उतरत आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT