जळगाव : सहा वर्षीय मुलाचा खून करून बापाची गळफास घेवून आत्‍महत्‍या

जळगाव : सहा वर्षीय मुलाचा खून करून बापाची गळफास घेवून आत्‍महत्‍या
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :  फैजपूर शहरातील बसस्थानकाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करुन बापाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारीच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, निलेश घनश्याम बखाल (वय-३५), हे बसस्थानकच्या मागे (मिरची ग्राऊंड फैजपूर, ता. यावल) हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यनसोबत राहत होते. ते फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवारी (दि. ७ जानेवारी) रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नीला किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी परतले. दरम्यान ११.३० ते १२ वाजता त्यांने घराचा दरवाजा आतून बंद केला. यानंतर निलेशने आपल्या सहा वर्षाचा मुलगा आर्यनचा गळा दाबून खून केला आणि स्वत: दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

थोड्या वेळाने निलेशची पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे तिला दिसून आले. दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारच्या मदतीने तिने दरवाजा उघडला. यानंतर तिला निलेश आणि आर्यनचा दोघांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेमुळे फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मृत घोषीत केले. या घटनेमागचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news