राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण 'त्यावेळी' होऊ शकतो विचार : राजेश टोपे | पुढारी

राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण 'त्यावेळी' होऊ शकतो विचार : राजेश टोपे

जालना ; पुढारी वृत्तसेवा

सगळ्यांना सध्या लॉकडाऊन लागण्याची भीती आहे, मात्र शासनाने लोकडाऊन संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालण्यात स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी ही माहिती दिली.

जालण्यात आरोग्य मंत्र्यांनी, त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत असताना सांगितले. टोपे ोम्हणाले की, लॉकडाऊन बद्दल तूर्त तरी कोणताही निर्णय झालेला नाही. सातशे मेट्रिक टन ऑक्सिजन आणि एकूण बेडच्या उपलब्धतेच्या ४०% प्रमाणात महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली तरच लॉकडाऊन लावण्याचा विचार होऊ शकतो.

परंतु आता तशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की, कोरोना बधितांची संख्या वाढली म्हणून घाबरण्याचे सध्यातरी कुठलही कारण नाही. सध्या हॉस्पिटलचे बेड खाली आहेत आणि कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दर देखील कमी आहे. म्हणुन घाबरण्यासारखं काही कारण नाही.

Back to top button