Latest

शिवसेना नेते यशवंत जाधव ईडीच्या रडावर; बजावले समन्स

मोनिका क्षीरसागर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना नेते यशवंत जाधव यांना समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांना फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) म्हणजेच विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावले, असे आर्थिक गुप्तचर संस्थेने सांगितले आहे. त्यामुळे सततच्या कारवाईमुळे शिवसेनेचे नेते यशंवत जाधव यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जात असल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर, कार्यालये अशा मालमत्तांवर काही महिन्यांपूर्वी प्राप्तीकर खात्याने छापेमारी केली होती. तेव्हापासून प्राप्तीकर खात्याकडून यशवंत जाधव यांच्या मालमत्तेचा तपास सुरु आहे. प्राप्तीकर खात्याने यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅटचा यात समावेश होता.

बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी यशवंत जाधव यांनी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही प्राप्तीकर खात्याच्या तपासात उघड झाले आहे. सोबतच कोरोनेशन बिल्डींग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डींगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने देण्यात आल्याची माहिती समोर आली. प्राप्तीकर खात्याकडून आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्राप्तीकर खात्याने केलेल्या तपासात यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तसेच काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात पैसे पोहोचविण्यात आले आणि गुंतवणूक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. तसेच एका इमारतीमधील फ्लॅटचे मालकी हक्क मिळवताना जाधव यांनी त्या फ्लॅटच्या विदेशात असलेल्या मूळ मालकांना अवैधरित्या पैसे पाठवल्याचेही समोर आले होते. त्यानुसार आता ईडीने या प्रकरणात फेमा म्हणजेच विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT