संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपला; संजय राऊतांचे स्पष्टीकरण | पुढारी

संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपला; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहा जागांसाठी चर्चा सुरू आहे. यामध्ये संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीच आमची अपेक्षा होती, मात्र त्याला संभाजीराजेंनी नकार दिल्याने संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपला असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार कोण असतील याची चर्चा सुरू आहे. यामध्ये कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि कोल्हपूरचे माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांची नावे चर्चेत होती. मात्र, संजय पवार यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केल्याने याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

खा. राऊत महणाले, शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवार व्हावे ही आमची माफक अपेक्षा होती. आम्ही ४२ मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो. मात्र, संभाजीराजेंना राजकीय पक्षाचं वावडं का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचलत का ?

 

 

 

 

Back to top button