Latest

१० रु. च्या पॅकेटमध्ये पाचच चिप्स! इंटरनेटवर चर्चाच चर्चा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्यासोबत कधी काय घडेल, सांगता येत नाही. कधी कधी अशा काही प्रसंग घडतात की, ज्यावर विश्वासदेखील बसत नाही. असाच प्रसंग रेडिटच्या एका यूजरला अनुभवावा लागलाय. चिप्स म्हटलं की आधी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मग ते नमकीन असलं तर मग खाल्ल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. भूक लागली असताना ऐनवेळी चिप्स सहजरित्या उपलब्ध होते.

युजरने रेडिटवर म्हटलंय- आम्ही भूक लागली म्हणून नमकीन, चिप्स विकत घेतले. चिप्स दीर्घकाळ टिकावीत, यासाठी चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरलेली असते. त्यामुळे आतमध्ये किती चिप्स आहेत, याचा अंदाज येत नाही. असेच एक चिप्सचे पॅकेट खरेदी केल्यानंतर त्यमध्ये ढीगभर हवाच होती आणि त्यामध्ये तुरळक म्हणजे पाचच चिप्स होते.

हा प्रसंग एका व्यक्तीसोबत घडला. तो कॉलेजला जाताना त्याने झटपट खाण्याचे ठरवले. त्याने दहा रुपयांचे चिप्सचे पॅकेट घेण्याचे ठरवले. जेव्हा त्याने चिप्सचे पॅकेट उघडले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसलय त्याला फक्त पाच चिप्स मिळाले.! चिप्सच्या पॅकेटमध्ये फक्त पाच चिप्स होते. त्याने Reddit वर एका फोटोसह ही माहिती शेअर केली. त्याने पोस्टला अशी कॅप्शन दिली की "आज, मी कॉलेजला जाताना १० रुपयांचे चिप्स पॅकेट विकत घेतलं आणि त्यात अक्षरशः ५ चिप्स होते. अरे!"

तुमच्यासोबत पण असं कधी घडलंय का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT