Robbie Coltrane Death: हॅरी पॉटर फेम हॅगरिड यांचे निधन | पुढारी

Robbie Coltrane Death: हॅरी पॉटर फेम हॅगरिड यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॅरी पॉटरमध्ये हॅगरीडची भूमिका साकारणारा अभिनेता Robbie Coltrane चं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. हॉलीवूडच्या हॅरी पॉटर (Harry Potter) सीरीजच्या या अभिनेत्याचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. या चित्रपटात हॅगरिड (Hagid) ची भूमिका साकारणारे अभिनेते रॉबी कोल्ट्रेन (Robbie Coltrane Death) यांनी स्कॉटलंडमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

रॉबी कोल्ट्रेन १९९० च्या दशकात क्रॅकर नावाच्या सीरीजमधून लाईमलाईटमध्ये आले होते. या सीरीजमध्ये त्यांनी एका गुप्तहेरची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांना ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजन ॲवॉर्ड्स (BAFTA) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रॉबी यांची एजेंट बेलिंडा राईट यांनी निधनाचे वृत्त दिले आहे. तसेच बेलिंडा यांनी हॅग्रीड यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harry Potter Film (@harrypotterfilm)

Back to top button