

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. विशेषतः देशी जुगाड असलेले व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. बस, रेल्वेमध्ये गर्दी झाली एकमेकांना धक्का लागतोच. पण रेल्वे डब्यात प्रवाशांना धक्का लागू नये म्हणून एका युवकाने केलेला देसी जुगाड पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. देसी जुगाडाचा हा व्हिडिओ (Viral video) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक युवक रेल्वेच्या डब्यातील आतील रेलिंग पकडून लटकत जाताना दिसत आहे. रेल्वेचा डबा प्रवाशांनी खचाखच भरला आहे. काही प्रवाशी डब्यात खाली झोपले आहेत. त्यांना धक्काही न लावता त्यांच्यावरुन लटकत सदर युवक रेलिंगला पकडून जाताना दिसत आहे.
हा व्हिडिओ Professor ngl नावाच्या यूजर्सने ट्विटरवर शेअर केला आहे. 'हा तर भारतातील स्पायडरमॅन आहे' अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ मजेशीर आहे पण त्याचवेळी हे दृश्य आपल्या देशातील आणि रेल्वेतील खरी परिस्थिती काय आहे हे दर्शवते," असे एका यूजरने लिहिले आहे. या व्हिडिओला ४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. (Viral video) हा व्हिडिओ एका लोकल रेल्वेतील असल्याचे समजते.
हे ही वाचा :