Latest

Petrol- Diesel Prices : पेट्रोल दराने पार केली १०८ रुपयांची पातळी

दीपक दि. भांदिगरे

Petrol- Diesel Prices : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल दरात लिटरमागे 25 पैशांची तर डिझेल दरात 30 ते 32 पैशांची वाढ केली.

ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 108 रुपयांच्याही वर गेले आहेत. पेट्रोल दर आता 108.19 रुपयांवर गेले आहेत तर डिझेलचे दर 98.16 रुपयांवर गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर तीन वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या आसपास आहेत. या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली आहे.

देशात इंधनाचे दर उच्चांकी स्तरावर पोहोचलेले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 101.89 रुपयांवरून 102.14 रुपयांवर गेले आहेत. तर डिझेलचे दर 90.17 रुपयांवरून 90.47 रुपयांवर गेले आहेत.

Petrol- Diesel Prices : चारही महानगरांचा विचार केला तर मुंबईमध्ये इंधनाचे दर सर्वात जास्त आहेत. शनिवारच्या दरवाढीनंतर तामिळनाडूमधील चेन्नई येथे पेट्रोलचे दर 99.80 रुपयांवर आणि डिझेलचे दर 95.02 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर क्रमशः 102.77 रुपये आणि 93.27 रुपयांवर गेले आहेत.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT