Latest

डेटिंग ॲपवर प्रेम नव्हे तर चक्क शोधली बहीण, आता ‘तो’ रक्षाबंधन साजरा करणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी-कधी तंत्रज्ञान इतकं पुढे जातं की, त्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं. कधी-कधी इंटरनेटच्या जगात काय होईल, हे आपण अंदाज पण लावू शकत नाही. असेच एक उदाहरण समोर आले आहे. एका व्यक्तीला बहीण नव्हती. रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे आणि व्यक्ती आपल्यासाठी बहीण शोधत होता अन्‌ चक्क त्याला बहीण सापडली…ते ही डेटिंग ॲपवर. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. एक व्यक्तीने बहीण शोधण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर केलाय.

डेटिंग ॲप टिंडरचा वापर सामान्यत: प्रेम आणि साथीदार शोधण्यासाठी केला जातो. पण, त्या व्यक्तीने रक्षाबंधनासाठी एक बहीण शोधायला ॲपचा वापर केला. मुंबईतील अज्ञात व्यक्तीने आपणास बहीण नसल्याची खंत बोलून दाखवली. त्यामुळे बहिणीच्या शोधात तो होता. यासाठी त्याने रेडिटचा आधार घेतला. प्रत्येक वर्षी आपणास बहीण नसल्याची खंत लागून राहायची. तो मागील दोन वर्षे आपल्या टिंडर बायोच्या माध्यमातून "रक्षा बंधनाच्या सणावेळी हँगआऊट करण्यासाठी एक बहीण शोधत होता. आता तो पुन्हा डेटिंग ॲपवर जाऊन मागील दोन आठवड्यांपासून बहीण शोधत होता.

रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी त्याने बहिणीचा शोध घेतला. डेटिंग ॲपच्या माध्यमातून त्याला आता दोन बहिणी मिळाल्या आहेत.
तो म्हणाला- मला राखी बांधण्यासाठी बहिण नव्हती. आता मी तिला गिफ्ट करत आहे. मागील २ वर्षांपासून रक्षाबंधनाच्या आधी २ आठवड्यांपासून बायो देत आहे की "रक्षाबंधनासाठी हँगआऊट करण्यासाठी एका बहिणीचा शोध." रेडिटवर ही पोस्ट आहे.

त्याने डेटिंग ॲप टिंडरचे आभार मानले आहेत. टिंडरमुळे मला दोन बहिणी मिळाल्या. आम्ही तिघे मिळून एकत्र रक्षाबंधन साजरा करू. मी बहिणींसाठी गिफ्ट घेऊन जाईन, अशीही पोस्ट त्याने लिहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT