Latest

Samantha ruth : नागा-शोभिताच्या डेटिंगवर ट्रोलर्सनी सामंथाला ओढलं

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य विषयी एक वृत्त व्हायरल झाले होते. अभिनेता नागा हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. हे वृत्त व्हायरल होताच काही ट्रोलर्सनी नागाची एक्स वाईफ सामंथाचं (Samantha ruth) नाव मध्ये आणलं. त्यामुळे सामंथा चांगलीचं भडकली. (Samantha ruth)

आता तुम्ही विचार करत असाल की, जेव्हा नागा चैतन्य-शोभिताच्या रिलेशनशिपविषयी वृत्त पसरले, तेव्हा एक्स वाईफ सामंथाला मध्ये का आणलं जातयं. तर मीडिया रिपोर्टनुसार, असं म्हटलं जात आहे की, नागाच्या फॅन्सनी सामंथावर आरोप केला की, सामंथाची पीआर टीम असल्या बातम्या पसरवत आहे.

नागा-शोभिताच्या रिलेशनशिप मध्ये आपलं नाव येताच सामंथा भडकली. ट्विटरवर ट्रोलिंग करणाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की,

Rumours on girl – Must be true !!
Rumours on boy – Planted by girl !!
Grow up guys ..
Parties involved have clearly moved on .. you should move on too !! Concentrate on your work … on your families .. move on!!

सामंथाचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. नागा-सामंथाने २०१७ मध्ये सात फेरे घेतले होते. त्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नागा आणि शोभिता एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत, असे म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT