‘शमशेरा’चे फर्स्ट लूक पोस्टर | पुढारी

‘शमशेरा’चे फर्स्ट लूक पोस्टर

रणबीर कपूरचा  ‘ब्रह्मास्त्र’ पाठोपाठ आता ‘शमशेरा’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. त्यावेळी रणबीरने चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला.

रणबीरने स्वतः पोस्टर फाडून धमाकेदार एन्ट्री केली व आपल्या उपस्थितीने चाहत्यांना थक्‍क केले. ‘यशराज फिल्मस्’ने या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

त्यामध्ये रणबीर चाहत्यांना मिठी मारताना आणि त्यांच्यासमवेत नृत्य करताना दिसतो. या चित्रपटात रणबीरशिवाय संजय दत्त आणि वाणी कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Back to top button