Latest

MS Dhoni Bharat Ratna धोनीला भारतरत्न मिळणार? जोरदार चर्चा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Bharat Ratna : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) दीड वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय केले. मात्र तो अजूनही आयपीएल खेळत असून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे.

धोनी पुन्हा जोरदार चर्चेत आला असून एमएस धोनीचा ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे. काल म्हणजेच गुरुवारी सकाळी लोकांनी त्यांचे ट्विटर उघडले तेव्हा कळले की टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी ट्रेंड करत आहे. नेमकं काय झाले ते लोकांना समजू शकले नाही. महेंद्रसिंग धोनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले असे काही तो बोला आहे का? एमएस धोनीने काही खळबळजनक ट्विट केले आहे? असे प्रश्न निर्माण झाले. मोठी गोष्ट म्हणजे एमएस धोनीसोबतच भारतरत्नही ट्रेंडमध्ये होता. म्हणजेच धोनीचा आणि भारतरत्नचा काय संबंध आहे समजत नव्हते. (MS Dhoni Bharat Ratna)

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी सकाळी एक ट्विट केले. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, जर सचिन तेंडुलकरला भारतरत्नने सन्मानित केले जात असेल तर वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही सन्मान झाला पाहिजे.

मग काय.. धोनीच्या चाहत्यांसोबतच वीरेंद्र सेहवाग लक्ष्मणचेही चाहते ट्विटरवर आले, त्यांनी ते रिट्विट, शेअर आणि लाईक करायला सुरुवात केली. त्यानंतर ट्विटरवर पूर आला. सुब्रमण्यम यांच्या ट्विट वर युझर्स सतत आपापले मत मांडत राहिले. सुब्रमण्यम स्वामींचे ते ट्विट हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केले.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, एमएस धोनीने वर्ल्ड कप 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यात सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. तेव्हापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुर गेला. एमएस धोनी टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा सातत्याने केली जात होती. पण मालिकांमागून एक मालिका जात राहिली, पण तो परतला नाही.

मात्र, अखेर एमएस धोनीनेही निवृत्ती जाहीर केली. जरी तो आयपीएल 2020 मध्ये खेळला. पण ते वर्ष सीएसकेसाठी सर्वात वाईट वर्ष ठरले. पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरू शकला नाही. पण यानंतर धोनीच्या कर्णधारपदी CSK ने 2021 IPL मध्ये शानदार पुनरागमन केले. या स्पर्धेत त्याच्या संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.

फायनलमध्ये धोनीच्या csk ने इऑन मॉर्गन कर्णधार असलेल्या केकेआरचा पराभव करत चौथ्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले. आता एमएस धोनी पुन्हा आयपीएल 2022 मध्ये CSK चे नेतृत्व करणार आहे. एमएस धोनीला यावेळीही कायम ठेवण्यात आले आहे. यावेळी संघाची कामगिरी कशी होते हे पाहावे लागेल. त्याचवेळी भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या मागणीची केंद्र सरकार दखल घेणार का हेही पाहावे लागेल.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT