मुंबई; पुढारी ऑनलाईन : MS Dhoni vs Ajinkya Rahane : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (ind vs nz test series) दुसरा सामना उद्यापासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यात ३३ वर्षीय अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मैदानात उतरण्याची संधी मिळाली तर तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) खास विक्रम मोडेल.
देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत एमएस धोनी १३व्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी रहाणे सध्या १४ व्या स्थानावर आहे. मुंबई कसोटीत अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून आणखी ८२ धावा निघाल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकेल. यासह, तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत १३ व्या स्थानावर पोहोचेल.
धोनी आणि रहाणेच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर धोनीने देशासाठी रेड बॉल क्रिकेटमध्ये ९० सामने खेळताना १४४ डावांमध्ये ३८.१ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने ६ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी २२४ धावांची आहे.
अजिंक्य रहाणेच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये ७९ सामने खेळताना १३४ डावांमध्ये ३९.३ च्या सरासरीने ४७९५ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटने आतापर्यंत १२ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. रहाणेची या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी १८८ धावांची आहे.