Latest

Amit Thackeray | पदे घेऊन चमकोगिरी नकाे, निवडणुकीच्या कामाला लागा; अमित ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील राजकारण्यांना सामान्य जनता वैतागली असून, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे नागरिकांच्या आशा लागून आहेत. अशात मनसेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायला हवी. केवळ पदे घेऊन चमकोगिरी करण्यापेक्षा जनतेला न्याय देण्याचे काम आपल्या हातून व्हावे, अशा शब्दांत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तंबी देत आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दिले. (Amit Thackeray)

संबधित बातम्या :

काही दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी रविवारी (दि.१७) पुन्हा एकदा नाशिक दौरा करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे मुख्यालय राजगड येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवर विस्तृत चर्चा केली. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित ठाकरे म्हणाले, 'राज ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार शाखा नव्हे नाका' ही मोहीम सुरू आहे. काही ठिकाणी नाका उघडून बोर्ड लावण्याचे काम केले गेले. मात्र, त्याचा उपयोग नसून पदाधिकारी आणि नेत्यांनी त्याठिकाणी थांबण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी नाशिक लोकसभा संघटक अ‍ॅड. किशोर शिंदे व गणेश सातपुते यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला शहराध्यक्षा अरुण पाटील, जावेद शेख, मुस्तफा हरसुलवाले, विद्यार्थी सेनेचे संदीप जगताप आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांची निवड

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आपल्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान मनविसे आणि मनसे पदाधिकाऱ्यांची निवड केली. त्यामध्ये मनविसेच्या शहराध्यक्षपदी ललित वाघ, मनविसे शहर संघटकपदी अक्षय कोंबडे यांची निवड केली. तसेच मनसे शहर सचिवपदी राज दिनकर ठाकरे, अक्षय घोलप, अमर जमधडे, सागर जुंद्रे, उपशहर सचिवपदी अक्षय आहेर, दीपक बोराडे, शंकर कानकुसे, गोपाळ हरकळ, ऋषिकेश कांबळे, जुने नाशिक विभाग अध्यक्षपदी अजिंक्य देवरे, मध्य नाशिक गणेश शेजवळ, पंचवटी अक्षय गवळी, नाशिकरोड शुभम आढाव, नवीन सिडको मेघराज नवले, जुने सिडको मनोज सावंत, सातपूर अविनाश जाधव यांची, तर पूर्व विभाग पंचवटी उपशहर अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी, जुने नाशिक शुभम गायकवाड, मध्य नाशिक नील राैंदळ, सातपूर वैभव देवरे, नाशिकरोड प्रशांत बारगळ, सिडको रोहन जगताप, आनंदवली अमोल भालेराव, पंचवटी विभाग सुयश मंत्री यांची निवड केली. तसेच शहर कार्यकारिणी सदस्यपदी धनराज रणदिवे, मोनिष पारख, प्रणव मानकर, विक्की जाधव, निखिल माळी, सिद्धार्थ सानप यांना निवडीचे पत्र दिले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT