वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकणे चुकीचे : नितीशकुमार | पुढारी

वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकणे चुकीचे : नितीशकुमार

पाटणा; वृत्तसंस्था : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने देशातील विविध वृत्तवाहिन्यांच्या 14 वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी आपण या बहिष्काराच्या विरोधात असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. ते स्वतः विरोधी आघाडीतील महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांच्या मत प्रदर्शनाला महत्त्व आले आहे.

ते म्हणाले, आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही. आपल्या देशात सर्वांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पत्रकारांना वाटेल ते त्यांनी लिहावे. पत्रकार त्यांच्या मनात येईल ते लिहू शकतात. पत्रकारांना त्यांचे अधिकार आहेत. मी पत्रकारांचा आदर करतो.

विरोधी आघाडीने चौदा प्रमुख वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकल्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, असा निर्णय झाल्याची मलाच माहिती नाही. जर तसे झाले तर ते चुकीचे आहे. पत्रकार जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्याला उत्तर देणे बंधनकारक नसते. तुम्ही त्यांचे प्रश्न टाळू शकता. मात्र, बहिष्कार घालण्याची कल्पना आपल्याला मान्य नाही. आपण याच्या विरोधात आहोत. पत्रकारांच्या लेखनाला कोणीही लगाम लावू शकत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

हेही वाचा : 

Back to top button