Nashik Accident : चांदवडला कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, कारमधील चार ठार | पुढारी

Nashik Accident : चांदवडला कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, कारमधील चार ठार

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. आज सोमवार (दि. 18) सकाळी साडे सातवाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अपघातग्रस्तांची अद्याप ओळख पटली नसून वडणेरभैरव पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते, ते धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

हेही वाचा :

Back to top button