Latest

लिएंडर-किम शर्मा यांचा लेट नाइट रोमान्स, डेटचा फोटो व्हायरल

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा- टेनिसपटू लिएंडर पेस यांचा लेट नाइट डिनर डेटचा पहिला फोटा समोर आला आहे. या फोटोत किम आणि लिएंडर एकत्र दिसून येत आहेत.

याआधी लिएंडर-किम शर्मा यांचे गोव्यातील रोमान्सचे फोटो व्हायरल झाले होते. किमने इन्स्टाग्रामवर लिएंडरसोबतच्या रिलेशनबाबत खुलासा केला होता. तर दुसरीकडे लिएंडरने किम सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा करत एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत असताना लिएंडरने मॅजिक असे म्हटले होते.

दरम्यान, शनिवारी रात्रीचे लिएंडर-किम शर्मा यांचे लेट नाइट फोटो व्हायरल झाले आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोत किम ऑफ शोल्डर स्टाइलिश टाइट टॉपमध्ये दिसून आली. तर लिएंडर ब्लू कलरचा टी शर्ट आणि जिन्समध्ये होता.

लिएंडर आणि किम यांनी याआधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा फोटो शेअर केला होता. नीरजचा फोटो शेअर करत लिएंडरने त्याचे अभिनंदन केले होते.

किमने याआधी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना यांना डेट केले होते. किमने उद्योजक अली पुनजनीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ती २०१० मध्ये केनियामध्ये स्थायिक झाली होती. पण दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला.

किमने 'सनम तेरी कसम'मधील कलाकार हर्षवर्धन राणे यालाही डेट केले होते. आता ती लिएंडर सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. लिएंडर याआधी रिया पिल्लई सोबत रिलेशनशीपमध्ये होता. या दोघांना अयाना नावाची मुलगी आहे.

किम शर्माने 'मोहब्बतें','तुम से अच्छा कौन है','जिंदगी रॉक्स','मनी है तो हनी है' अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT