Latest

Irrfan Khan Birth Anniversary : इरफानचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न का राहिलं अधुरं?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेत्यांपैकी एक दिवंगत अभिनेता इरफान खानचा (आज ७ जानेवारी) जन्मदिवस. एक हरहुन्नरी कलाकार ज्याला आजही प्रेक्षक आठवण करतात. इरफान खानने अनेक चित्रपटांमध्ये असे अभिनय केले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यांचा जन्म ७ जानेवारी, १९६७ रोजी झाला होता. २९ एप्रिल, २०२० रोजी कॅन्सरने निधन झालं होतं.(Irrfan Khan Birth Anniversary) इरफानने आपल्या करिअरमध्ये जवळपास ७० चित्रपट केले. यामध्ये हॉलीवूड चित्रपटांचाही समावेश आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'अग्रेंजी मीडियम' होता. (२०२०) इरफानने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. परंतु, खूप कमी लोकांना माहिती आहे की, इरफान खानला कधीच अभिनेता व्हयचं नव्हतं. त्याचं क्रिकेटर व्हायचं स्वप्न होतं. (Irrfan Khan Birth Anniversary)

इरफान खान एक सामान्य परिवारातून आहे. परिवाराच्या मदतीसाठी तो एसी रिपेअरिंगचं काम करत होता. नोकरी करताना राजेश खन्ना यांच्या घरी एसी रिपेअर करण्याची त्याला संधी मिळाली होती. त्याचं स्वप्न क्रिकेटर व्हायचं होतं. पण, ते स्वप्न अपूर्ण राहिलं. त्याने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि तेथून त्याच्या करिअरची गाडी सुरु झाली.

चित्रपटामध्ये आल्यानंतर केलं स्ट्रगल

इरफान खानने थिएटरदेखील केलं. यानंतर त्याला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत येण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. एकानंतर एक अपयश आल्यानंतरदेखील त्याने हार मानली नाही. त्याला काम मिळणे सुरू झालं. त्याने टीव्ही मालिकेतही काम केलं. पहिल्यांदाच त्याला 'सलाम बॉम्बे' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

ज्यावेळी ही भूमिका त्याला मिळाली होती, तेव्हा तो ॲक्टिंग स्कूलमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता. या भूमिकेविषयी कोणताही विचार न करता त्याने होकार दिला होता. भूमिका छोटी असली तरी त्याची प्रतिमा या भूमिकेतूनचं अढळ झाली होती.

इरफान खानचं पूर्ण नाव

इरफान खानचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं होतं.

SCROLL FOR NEXT