Uttarakhand Joshimath : आई भगवतीचे मंदिर कोसळले, लोकांमध्ये दहशत | पुढारी

Uttarakhand Joshimath : आई भगवतीचे मंदिर कोसळले, लोकांमध्ये दहशत

पुढारी ऑनलाइन डेस्क : उत्तराखंडातील जोशीमठातील आई भगवतीचे मंदर शुक्रवारी भूस्खलनामुळे कोसळले. आधीच भूस्खलनामुळे दरार पडणे, रस्त्यांना भेगा पडणे यामुळे घाबरलेल्या लोकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत पसरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर जोशी मठाच्या सिंहधार वॉर्डात होते. जे भूस्खलनामुळे संपूर्ण कोसळले. Uttarakhand Joshimath

उत्तराखंडमधील जोशीमठ हे गाव अचानक खचू लागले असून अनेक रस्ते भेगा पडून दुभंगले आहेत, तर ५०० हून अधिक घरांना तडे गेले आहेत. भीतीपोटी ६६ कुटुंबांनी गाव सोडले असले तरी अद्यापही ३०० हून अधिक कुटुंबे जीव धोक्यात घालून तेथे राहत आहेत. या भागात असलेला आशियातील सर्वात मोठा रोप वेही बंद करण्यात आला आहे.

Uttarakhand Joshimath बद्रीनाथचे प्रवेशद्वार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या जोशीमठ गावाची सध्या झोप उडाली आहे. गावाची जमीन खचू लागली असून हे गाव जमिनीच्या पोटात गडप होते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने सगळीकडे भयाचे वातावरण आहे. पर्यटकांचा ओघही कमी झाला आहे. चहलपहल असणाऱ्या या गावात सगळीकडे अस्वस्थ वातावरण आहे. छोट्या- मोठ्या रस्त्यांना तडे गेले असून काही भाग जमिनीत गडप झाला आहे.

नगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार ५६६ घरांना तडे गेले असून यातील बहुतांश घरे राहण्यासाठी सुरक्षित राहिलेली नाहीत. पायाखालची जमीन कधी दुभंगेल सांगता येत नाही. ज्या ठिकाणी रस्त्यांना तडे गेले आहेत तेथे अचानक एका भागात उंचवटे तर दुसऱ्या भागातील रस्त्यांच्या जागी मोठाले खड्डे पडत आहेत. काही खड्ड्यांतून खळाळणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील वाहताना दिसत आहे. हा भाग भूकंपप्रवण असल्याने जमीन लवकर खचते. त्यात हे असे झपाट्याने होत असल्याने सगळे गावच खचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. Uttarakhand Joshimath

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जोशीमठ भू-स्खलनामुळे अति संवेदनशील क्षेत्रांमध्ये बनलेल्या घर व अन्य भवनांना तत्काळ खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रभावग्रस्त लोकांना सरकार त्यांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने टप्प्याटप्प्याने संवेदनशील जागेवरून सगळ्यांना शिफ्ट केले जाईल, असे म्हटले आहे.

Uttarakhand Joshimath जोशीमठ भूस्खलनाचा सविस्तर अहवाल जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना पाठवला आहे. डीएम म्हणाले की, शहरातील एकूण 561 इमारतींना तडे गेले आहेत. जोशीमठच्या तपासणीच्या आधारे गांधी नगरमध्ये 127, मारवाडीमध्ये 28, लोअर बाजार नरसिंग मंदिरात 24, सिंहधरमध्ये 52, मनोहर बागेत 69, अप्पर बाजार दादोनमध्ये 29, सुनीलमध्ये 27, परसारीमध्ये 50, रविग्राममध्ये 153 जणांचा समावेश आहे. 561 इमारतींना भेगा पडल्या आहेत.

Uttarakhand Joshimath दुसरीकडे, शुक्रवारी गढवालचे आयुक्त सुशील कुमार आणि आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजित कुमार सिन्हा यांच्यासह भूवैज्ञानिकांच्या पथकाने जोशीमठमधील भूस्खलनाच्या संदर्भात बाधित भागांचे सखोल सर्वेक्षण केले. सचिव रणजित सिन्हा यांनी सांगितले की, जोशीमठ शहरात दरड कोसळण्याचे कारण तपासले जात आहे. टीमकडून प्रत्येक दृष्टिकोनातून समस्येचे मूल्यांकन केले जात आहे. घरांना तडे जाणे ही चिंतेची बाब आहे. सध्या आमचे प्राधान्य बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे आहे.

हे ही वाचा :

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित PAFF वर बंदी, अरबाज अहमद मीरला केले दहशतवादी घोषित

Chitra Wagh vs Rupali Chakankar : महिला आयोगाच्या नोटीशीची वाघ यांनी उडवली ‘खिल्ली’, वाचा चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Back to top button