Saath Sobat Movie : या दिवशी प्रदर्शित होणार ‘साथ सोबत’

sath sobat movie
sath sobat movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारा 'साथ सोबत' हा मराठी चित्रपट १३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. (Saath Sobat Movie) आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, वास्तवदर्शी चित्र, मनमोहक कॅमेरावर्क, सहजसुंदर दिग्दर्शन, कसदार अभिनय आणि दर्जेदार कथेने 'साथ सोबत' सजला आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (Saath Sobat Movie)

प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच 'साथ सोबत'चं लेखनही दिग्दर्शक रमेश मोरे यांनी केलं आहे. कोकणातील वास्तव मांडणारा या चित्रपटात ग्लोबल विषय पहायला मिळणार आहे. त्याला एका सुरेख प्रेमकथेची किनार जोडण्यात आली आहे. गाव-पातळीवरील वास्तव चित्र किती भयाण आहे आणि कोकणासारख्या भागात काय परिस्थिती आहे याचं सत्य दर्शवणारा हा चित्रपट आहे.

मोहन जोशींनी साकारलेले वयोवृद्ध डॅाक्टर आणि संग्रामच्या रूपातील तरुण डॅाक्टर बरंच काही शिकवणारे आहेत. त्यांना मृणाल कुलकर्णींनी सुरेख साथ दिली आहे. अनिल गवस यांनी साकारलेला पिता तसेच ९० व्या वर्षी राजदत्त यांना अभिनय करताना पाहणं म्हणजे आजच्या पिढीच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे.

यशश्री मोरे यांच्यासोबत रमेश मोरेंनी लिहिलेली अर्थपूर्ण गाणी कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारी आहेत. संगीतकार महेश नाईक यांनी या गाण्यांना सुरेल संगीत दिलं आहे. कोकणातील चिपळूण-सावर्डे आणि आसपासचा निसर्ग मनाला मोहिनी घालणारा आहे. डिओपी हर्षल कंटक यांच्या सिनेमॅटोग्राफीची आणि अभिषेक म्हसकर यांच्या संकलनाची कमाल यात आहे. चिरेबंदी घरांसोबतच जुनं ते सोनं म्हणत आजही ताठ उभी असणारी मातीची घरंही चित्रपटाचं सौंदर्य खुलवणारी आहेत.

संगीतकार महेश नाईक यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी रंगभूषा केलीय. यशश्री मोरे यांनी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन प्रकाश कांबळे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. मीनल घाग यांनी नृत्य दिग्दर्शन व केशभूषा अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news