Latest

Harpal Randhawa : भारतीय उद्योगपतीचा झिम्बाब्वेत विमान अपघातात मुलासह मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : तांत्रिक बिघाडामुळे दक्षिण-पश्चिम झिम्बाब्वेमधील (Zimbabwe) हिऱ्यांच्या खाणीजवळ खासगी विमान कोसळले. यामध्ये झिम्बाब्वेतील भारतीय अब्जाधीश उद्योगपती हरपाल रंधावा (Harpal Randhawa) आणि त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंग रंधावा यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी (दि.२९) हा भीषण अपघात झाला.

संबंधित बातम्या : 

मशावा येथील जवाम्हंडे भागात हे विमान कोसळले. झिम्बाब्वेमध्ये हरपाल रंधवा (Harpal Randhawa) यांची 'रियोझिम' (Rio Zim) ही सोने, कोळसा तसेच निकेल आणि तांबे शुद्धीकरण करणारी खाण कंपनी आहे. 'रियोझिम' (Rio Zim) च्या मालकीचे सेसना २०६ हे विमान शुक्रवारी हरारेहून मुरोवा हिऱ्याच्या खाणीकडे जात असताना हा अपघात झाला. विमान मुरोवा हिऱ्याच्या खाणीजवळ क्रॅश झाले. 'इहाररे' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तातनुसार, जवाम्हंडे येथील पीटर फार्ममध्ये कोसळण्यापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याचा हवेतच स्फोट झाला असावा. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

'द हेराल्ड' वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अपघातात ठार झालेले चार जण परदेशी होते, तर इतर दोघे झिम्बाब्वेचे नागरिक होते. पोलिसांनी अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत. परंतु रंधवाचे मित्र, पत्रकार आणि चित्रपट निर्माते होपवेल चिनोनो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) द्वारे शोकसंदेश देखील पोस्ट केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT