Terrorist Hafiz Son Missing : 26/11 चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा ‘कमालुद्दीन’ बेपत्ता; ISI ला सुद्धा सुगावा नाही | पुढारी

Terrorist Hafiz Son Missing : 26/11 चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा 'कमालुद्दीन' बेपत्ता; ISI ला सुद्धा सुगावा नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI (देखील) त्याला शोधू शकलेली नाही. ISI ला अद्याप त्याच्या बाबतीत कोणताही सुगावा मिळालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. (Terrorist Hafiz Son Missing)

संबंधित बातम्या:

भारताला मोस्ट वॉन्टेड असलेला पाकिस्तामधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) म्होरक्या सईदचा मुलगा कमालुद्दीन अचानक बेपत्ता झाल्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसह सर्वच दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. तर कमालुद्दीनला अटक करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. (Terrorist Hafiz Son Missing)

सईद आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित

अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी दावा केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने देखील त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. हाफिज सईद हा पाकिस्तानी नागरिक असून, तो मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा दहशतवादी सईद सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे. दरम्यान सईदला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हाफिज सईदची पाकिस्तानस्थित संघटना लष्कर-ए-तोयबाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, भारत, अमेरिका, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. (Terrorist Hafiz Son Missing)

संसदेवरील हल्ल्याचा कट रचण्यासाठी भारताने ठरवले होते जबाबदार

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लाहोरमधील जमात-उद-दावा या प्रतिबंधित संघटनेचा नेता हाफिज सईदच्या पाकिस्तानातील घराबाहेर जून, २०२१ मध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला. ज्यामध्ये ३ जण ठार झाले आणि २० हून अधिकजण जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने मार्च 2023 मध्ये तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर हाफिज याला संयुक्त राष्ट्रानेही दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हाफिजवर अमेरिकेने एक कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. सईदला जुलै 2019 मध्ये दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2001 च्या संसदेवरील हल्ल्याचा कट रचण्यासाठी भारताने सईदला जबाबदार धरले होते. तेव्हा पाकिस्ताननेही सईदला एकदा नजरकैदेत ठेवले होते. असे पाकिस्तानमधील माध्यमांनी स्पष्ट केले आहे. (Terrorist Hafiz Son Missing)

अमेरिकेच्या दबावाखाली हाफिज सईदला अटक

२००८ च्या 26/11 मुंबई हल्ल्यात ६ अमेरिकनांसह १६६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबई हल्ल्यात अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूबाबत अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला होता. यानंतर हाफिज सईदला अटक करण्यात आली होती. सईदच्या अटकेबाबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘दहा वर्षांच्या शोधानंतर मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कथित सूत्रधाराला अखेर अटक करण्यात आली आहे’, असे म्हटले होते.

हेही वाचा:

Back to top button